मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा ‘आरे’ दुधाची एन्ट्री होणार असून, एकेकाळी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेले आरे दूध आता नव्या रूपात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पुढाकारातून ‘आरे’ ब्रँडला नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आज दुग्धव्यवसाय विकास आयुक्त आणि महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीत पुनरागमनाच्या प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला.

आधुनिक तंत्रज्ञानासह नवी सुरुवात
नव्या टप्प्यात दूध प्रक्रिया, पॅकेजिंग आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार दूध देण्यावर विशेष भर असेल.