खेड : – तालुक्यातील भरणेनाका येथील ब्रिजवरील रस्ता ओलांडणाऱ्या अमित सूर्यकांत फावरे ( ३७ , रा. लोटे – माळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी ) या तरुणाला भरघाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. हि दुर्देवी घटना शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
अपघाताची खबर मिळताच भरणे ब्रिजखाली उभी असलेली विनामूल्य नरेंद्राचार्य नाणीजधामची २४ तास रुग्णवाहीकेचा चालक सुरज हंबीर हा अपघातस्थळी दाखल होत, या तरुणास कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वी तो मयत झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत