पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
