डेरवण : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे डेरवण येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे घरावरील कौलारू पत्रे सुमारे २० ते २५ फूट उडून रस्त्यावर पडली. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. स्थानिकांकडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख राकेश जंगम यांचे घराचे मोठे नुकसान
