चिपळूण : सेवानिवृत्त अभियंता श्री नरेंद्र जयराम बेलवलकर यांची अँटी करप्शन बोर्ड (अभियंता सेल) या संस्थेच्या माध्यमातून चिपळूण तालुका प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे. सदरची नेमणूक सरकार मान्य अँटीकरप्शन बोर्ड दिल्ली यांच्याकडून तीन वर्षांकरिता करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण, या विभागातून 39 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ सेवा करून अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
शासकीय सेवेअंतर्गत असताना स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक या शासन मान्यता प्राप्त संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून जवळपास वीस वर्षे काम पाहिले आहे.
सध्या ते भारतीय जनता पार्टी चिपळूण शहराचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज संस्थेचे खजिनदार म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे.