खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील कोरेगाव, शिर्शि, सवनस , नांदगांव,आमशेत आदी खडीपट्ट्यातील गावांसाठी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिरात २४ एप्रिल रोजी तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरास तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, माजी सरपंच देवेंद्र मोरे प्रकाश मोरे, दाऊद दुदुके, मंडल अधिकारी राजाराम घुले, पोलीस पाटील सुबोध जाधव, हिरालाल माळी, कोतवाल गंगाधर तांबे तसेच कोरेगावच्या सरपंच, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, आरोग्यसेवक आदींसह आजी-माजी पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.