खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेचे सहा. शिक्षक व रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. पंकज हालके यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) (कार्यक्षेत्र भारत) दापोली यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यस्तरीय आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार-2026 प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेले शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्था यांना पुरस्कारांचे वितरण केले जाते. प्रशालेचे सहा. शिक्षक व रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. पंकज हालके यांना सदर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत व महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील 15 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सतत कार्यरत राहून , शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन इ. 11 वी 12 वी ला रसायनशास्त्र विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, JEE, NEET व CET सारख्या स्पर्धा परीक्षांना रसायनशास्त्र विषयाचे मार्गदर्शन इत्यादी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. RTO दापोलीने या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला हे ज्ञानदीप परिवाराला अभिमानास्पद आहे.