रायगड : रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मोठी खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. एकाच वेळी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बोलेरो पिकअपमधील संशयास्पद धातू वाहतूक प्रकरणाच्या तपासात गंभीर गैरवर्तन आणि त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. रायगडच्या डँशिंग पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी केलेल्या या कारवाईने रायगडच्या पोलीस दलात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे LCBच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. तपासातील त्रुटी, निष्काळजीपणा की गंभीर गैरवर्तन याबाबत आता विभागीय चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित पोलिसांनी नेमकं काय केलं असेल? त्यांना निलंबित का करण्यात आलं असेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या चौकशीत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. ते दोषी आढळले नाहीत तर त्यांना पुन्हा नियमित सेवेत रुजू केले जाईल. पण या कारवाईची सध्या रायगडमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.