चिपळूण : शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे तसेच वाढत्या रहदारीमुळे पादचारी नागरिक आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना रस्ते ओलांडताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी चौक (चिंचाळा), गांधी चौक, बहादुरशेख नाका आणि संभाजी चौक या गर्दीच्या ठिकाणी तातडीने झेब्रा क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी, अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने त्वरित पावले उचलून शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
