चिपळूण : दि. 13 आणि 14 डीसें रोजी महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन तर्फे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी पुणे येथे राज्यस्थरीय अथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग,वेटलिफ्टिंग, हॉलि्बॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस ई. स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये चिपळूण च्या सौ निशा आंबेकर यांनी 45+ वयोगटात गोळाफेक सुवर्णपदक , थाळीफेक सुवर्णपदक , हॅमर थ्रो सुवर्णपदक , 100 मी फ्री स्टाईल सुवर्णपदक, 200 मी फ्री स्टाईल सुवर्णपदक आणि पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक अशी अनुक्रमे 6 सुवर्णपदके आणि 50 मी. फ्री स्टाईल मध्ये सिल्व्हर मेडल एकूण ७ पदके मिळवून चिपळूण चे नाव उज्वल केले आहे … निशा या स्पर्धेत सर्वाधिक मेडल मिळवणारी खेळाडू ठरली आहे. त्यासाठी असोसिएशन चे अध्यक्ष श्री बाळू चव्हाण यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्स अंतर्गत ४० वर्षापुढील वयोगटात १०० मी. फ्री स्टाईल,५० मी. फ्री स्टाईल, ५० मी. बॅकस्ट्रोक ,५०× ४ रिले फ्रि स्टाईलमध्ये चार सुवर्णपदक, थाळीफेक , गोळा फेक, हॅमर थ्रो यामध्ये तीन रौप्यपदक तर १००×४ रिले रनिंगमध्ये कांस्य पदक अशी एकूण आठ पदके मिळवली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर गोवा येथे ३ गोल्ड ,२ सिल्वर , १ ब्राँझ पदक मिळवले. नोव्हेबर २३ मध्ये स्विमिंग आणि मैदानी मध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य तर १ ब्राँझ पदक मिळवले आहे . राष्ट्रीय स्तरासाठी निवड. फेब्रुवारी 24 मध्ये 200,300,400, आणि 600 km सायकलिंग करून सायकलिंग क्षेत्रातील मनाचा समजला जाणारा “Super Randonnuer ” हा ‘किताब मिळवला.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार : एकंदरीतच त्यांच्या धाडसाबद्दल दि फ्रेश न्यूज कडून त्यांना “स्वयंसिद्धा” हा कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त झाला.
सातारा संस्थांनचा “जीवन गौरव” पुरस्कार,तसेच महिला मंडळ वडनाका चिपळूणनेही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल “कर्तृत्व वान महिला ” म्हणून त्यांचा सन्मान केला. डिसेंबर 22 मध्ये रत्नागिरी कर सल्लागार असोसिएशनचा “Sports Activity” चा सन्मान प्राप्त.मार्च 2024 ला महिला दिननिमित्त “राज्यस्तरीय कर्तृत्व वान महिला नारिरत्न पुरस्कार 2024” प्राप्त. 18 डिसेंबर 24 मध्ये “इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन ” चा “भारत विकास रत्न पुरस्कार 2024” हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त. 22 एप्रिल 2025 रोजी कोल्हापूर येथे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या हस्ते “Business Women of the year” हा राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त. चिपळूण महिला मंडळ वडनाका तर्फे “कर्तृत्ववान महिला पुरस्कार” प्राप्त. मा.आमदार शेखर निकम यांच्या कडून विशेष सन्मान प्राप्त. याशिवाय त्यांचे सामाजिक कार्य चालू असते , विविध संस्थाना भेटी देणे, देणग्या देणे , तसेच गरीब होतकरू मुले शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतली आहेत . शिवाय विविध पाककला स्पर्धांमध्ये तसेच केक स्पधेमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. शिवाय क्रीडाभारती, संस्कृतभारती, चिपळूण सायकलिंग क्लब, परिमल मंडळ ई. संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत… लव्ह जिहाद या विषयावर कार्यरत ,व्यसनाधीन लोकं / त्यांची कुटुंब यांच्या साठी विशेष काम करतात .