मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे आज संपूर्ण मुंबईत १५० हून अधिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “कामगार सन्मान कार्यक्रम” तसेच “सामूहिक महाराष्ट्र गीत” सादर करून कामगारांच्या योगदानाला मानाचा मुजरा देण्यात आला आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात आला.
हे सर्व कार्यक्रम भाजपा मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमांमध्ये भाजयुमो मुंबई, जिल्हा, मंडळ व वॉर्ड स्तरावरील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध ठिकाणी कामगार बांधवांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी “जय जय महाराष्ट्र माझा” या प्रेरणादायी महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने वातावरण देशभक्ती व अभिमानाने भारावून गेले.
