पनवेल : निसर्ग हा मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. आणि त्याचा खरा दागिना म्हणजे वृक्ष.आज अपरिमित वृक्षतोडीमुळे मानवाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे . म्हणूनच आजच्या काळात ‘वृक्षारोपण ही केवळ एक उपक्रम नमून ती मानवाची गरज आहे.
याच भावनेतून पर्यावरणाची सामाजिक ग बांधीलकी जपत असताना पंचरत्न मित्र मंडळ ( चेंबूर) व कोकण कट्टा संस्था याच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी २३ ऑगस्ट २०२६ रोजी. श्री स्वामी समर्थ मठ ( आपटे फाटा, पनवेल) व ग्राम संवर्धन संस्था ,बांधनवाडी पनवेल येथे आयोजित केला होता.
सुमारे २५० ते ३०० झाडे फणस , आंबा, चिकू ,काजू आवळा ,चाफा इत्यादी झाडांचे वाटप व वृक्षारोपण आर.सी. एफ. चे महाव्यवस्थापक मान .श्री. शशिकांत हेडाऊ व मान श्री . संतोष शिकतोडे साहेब ( उप अभियंता , मनपा नवी मुंबई ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले . एनजिओच्या श्रीमती नीलाजी भट यांनी देखील अदिवासी पाड्यातील लोकांना फळ झाडे देऊ केली. अध्यक्ष श्री अशोक भोईर व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वामी समर्थ मठ व आसपास च्या व आदिवासी भागात वृक्षारोपण केले.
पंचरत्न मंडळाच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपणा पेक्षा वृद्धसंवर्धन करने फार
महत्वाचे आहे. असे वैभव घरत यांनी समजावून सांगीतले. मंडळाच्या सर्व कार्यकत्यांनी उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्याकरीना खूप मेहनत घेतली . कार्यक्रमात मंडाळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर व सेक्रेटरी श्री-प्रदीप गावंड, खजिनदार श्री-सचिन साळूंखे ,चिटणीस : श्री वैभव घरत ,सदस्य : श्री प्रकाश शेजवळ ,पुरु पाटसावगीकर , श्री सचिन राखाडे ,श्री संदीप पाटील , श्री . डी . एम . मिश्रा , श्री रहीम शेख , सौ नीलम गावंड, नीता पाटील , अंजली मोर्या , सौ .स्वाती पाटील इ. मान्यवर उपस्थित होते .
