मुंबई : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर २२ ते २६ जुलै या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

आदरणीय अजितदादा म्हणजे अथक परिश्रम, दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेते. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि विद्यार्थी यांना त्यांचा भक्कम आधार होता. कृषी, सहकार, अर्थ, उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात दादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केले आहेत.