दापोली :दापोली येथील संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येकाच्या आयुष्यातील आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई व तिच्याप्रति आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृवंदना हा कार्यक्रम नर्सरी, ज्युनियर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला.

चिमुकल्यांनी आपल्या आईंचे औक्षण करून त्यांचे पूजन केले तसेच त्यांच्या चरणी वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. हा भावनिक व संस्कारमय सोहळा पाहून उपस्थित पालक भारावून गेले. कार्यक्रमानंतर पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला असून संस्थेचे सचिव सुजय मेहता यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी श्लोक पठण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व प्रभावी सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले—
श्लोक पठण स्पर्धा
गट क्रमांक १ (इयत्ता १ ते २):
१) चार्वी वैभव विचारे – प्रथम क्रमांक
२) अधिराज सचिन जगताप – द्वितीय क्रमांक
३) आराध्या राजेश पवार – तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ – अभिज्ञा ज्ञानरतन जाधव

गट क्रमांक २ (इयत्ता ३ ते ४):
१) तीर्था प्रफुल्ल साठे – प्रथम क्रमांक
२) समर्थ जयवंत चव्हाण – द्वितीय क्रमांक
३) दिव्यांका संदीप शिगवण – तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ – कविश कमलेश मिसाळ

तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.

कथाकथन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक – स्वरा समीर पांगत, द्वितीय क्रमांक – ओवी सिद्धार्थ हवळ, तृतीय क्रमांक – नील समीर मोरे, तर उत्तेजनार्थ – श्लोक जगदीश शिर्के यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शिक्षकवर्गाने केले असून उपस्थितांनी या संस्कारमय उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.