चिपळूण : जिल्हा नगरोत्यान सन 2024 – 25 अंतर्गत, चिपळूण नगरपरिषद हद्दीतील – काविळतली येथील फुलपाखरू उद्यानाचे उदघाटन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

नगरमध्ये चांगल्या प्रतिचे उद्यान व्हावा अशी नागरिकांची मागणी केली होती आणि ती पूर्ण झाल्याने नागरिकांनी मनापासून आमदार महोदय यांचे कौतुक केले. वयस्कर वृद्ध, तरुण मुलं, बालके व नागरिक साठी हे उद्यान पर्वणी ठरणार आहे याप्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषदश्री. संजय जाधव, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, महिला शहराध्यक्ष आदिती देशपांडे, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर मॅडम, योगेश पवार, कपिल शिर्के, संजय गोताड, सफा गोठे, विकी नरळकर, नसरीन खडस, शहनाज वांगडे, शशिकांत मोदी, हर्षाली पवार, निहार कोवले, रसिक देवळेकर, राणी महाडिक, मिस्बाह नाखुदा, वैशाली निमकर, अंजली कदम, अंकुश आवळे, शिल्पा देसाई, गणेश आंग्रे, विकी लवेकर, फैसल कास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.