चिपळूण : महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह प्रा. लि.बँक चिपळूण यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मोफत महाआरोग्य शिबिर लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण . उपजिल्हा रुग्णालय कामथे., nab .आय हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांची तपासणी औषधे इसीजी, रक्तदाब ,मधुमेह ,कर्करोग ,अस्थमा दमा, इंजेक्शन, सलाईन , महिलांची तपासणी, काना घसा तपासणी , डोळे तपासणी,अशा अनेक सुविधा उपलब्ध होत्या हे शिबिर आयोजित करण्याकरता रुग्णसेवक, समाजसेवक श्री शशिकांत मारुती चव्हाण यांनी विशेष मेहनत घेऊन अगदी थोडक्यात या शिबिराचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांच्या 15 वर्षाच्या प्रदीर्घ रुग्णसेवेत 1300 वे हे आरोग्य शिबिर यशस्वी आयोजन केलं म्हणून दि. चिपळूण अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह प्रा लि चिपळूण यांचे चेअरमन श्री मोहन यांनी श्री शशिकांत चव्हाण यांचे आभार मानले यांच्या वैद्यकीय कार्याची प्रशंसा केली आणि सन्मानित करण्यात आले याही पुढे आपण आरोग्य क्षेत्रामध्ये चांगला काम करावं आपल्यातून काम घडावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या या शिबिरामध्ये 117 लोकांनी लाभ घेतला अनेक रुग्णांना पुढील शस्त्रक्रिया तपासण्यासाठी डॉक्टरांनी निवड केली शिबिराला सर्व संचालक मंडळ तज्ञ डॉक्टर बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मोठ्या उत्साहामध्ये या शिबिर पार पडले