वेंगुर्ला (अजय गडेकर ) :वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर च्या वार्षिक जत्रोत्सवास विशाल जनसमुदाय लोटला आहे.आज सोमवारी पहाटे 3.30 वाजता या सोहळ्यास सुरुवात झाली असून भगवी निशाणे देवतेस वाहण्यासाठी वेंगुर्ला शहर, सर्वच ग्रामीण भाग तसेच जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, गोवा व अन्य भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.वेंगुर्ला एस. टी. स्थानक पासून मानसीश्वर मंदिर परिसरात पहाटेपासून नवस फेडण्यासाठी भाविकांची दुपारपर्यंत मोठी गर्दी उसळली आहे. रात्री गॅसबत्तीच्या प्रकाशात पार्सेकर दशावतार कंपनीचे दशावतारी नाटक सादर होणार आहे. सर्व ग्रामस्थ, प्रशासन यांच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. या देवतेच्या आगळ्यावेगळ्या जत्रोतसंवामुळे वेंगुर्ला शहराचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY