खेड :- तालुक्यातील शिंगरी गावातील बौद्ध वाडीमध्ये 35 वर्षीय तरुण महेश दगडुशेठ पवा,पवार याने आपल्या घराच्या पत्र्याच्या चॅनलला नायलाॅन दोरीच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
ही घटना सोमवार दिनांक 21 सष्टेबर 2026 रोजी सायंकाळी 17.00 वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 22 सष्टेबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजताच्या मुदतीत घडली असून, मयत महेश दगडु पवार याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्यावर त्याला उपचारार्थ कळबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकिय तपासणीस तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु रजिस्टर नंबर 82/2026 बीएनएसएस 194 नुसार नोंद करून अधिक तपास पोलीस करीत आहेत.