शिरगाव : के जी एन स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आई महाकाली संघाला नमवित आर्यन सय्यदवाडी संघाने विजेतेपद पटकाविले त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनेदन केले.
सदरच्या स्पर्धेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाले,कुंभार्ली उपसरपंच संदीप कोलगे,माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजाभाऊ नारकर,अशोक गांधी, ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव,कुंभार्ली शिरगाव जमातीचे अध्यक्ष बशीर कडवेकर,जेष्ठ अब्दुल रहेमान कडवेकर,महमद कडवेकर, बाबा कुंभार्लीकर, असलम कुंभार्लीकर, हमीद कुंभार्लीकर, माजी उपसरपंच इकबाल कडवेकर, सिकंदर शेख,रफीक शिकलगार, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे के जी एन स्पोर्ट्स यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
के जी एन स्पोर्ट्स क्लबच्या चषकावर आर्यन सय्यदवाडी संघाने नाव कोरले
