मुंबई – एनडीए सरकारला 2029 मध्ये लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळेल. त्याअनुषंगाने इतरांनी जरी पाठिंबा नाही दिला तरी महिला विधेयक आम्ही पास करणार आहोत एवढं बहुमत एनडीए सरकारकडे असेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आ. संजयमामा शिंदे म्हणाले, बहुजन वर्गासाठी राज्यामध्ये गेली 50 वर्षे ना. रामदास आठवले यांनी सातत्याने काम केले आहे. कुर्डुवाडीतील रेल्वेच्या आजपर्यंतच्या प्रश्नांमध्ये सातत्याने लक्ष घालून काम केले आहे. भविष्यामध्येही विकासाच्या दृष्टीने आपण मदत कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
