मुंबई (प्रतिनिधी): काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थ़ॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे, ही एक मोठी साधना आहे आणि साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कोणाला हिरव्या रंगाचे तर कोणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदरच आहे. हिरवा रंग सुबत्तेचे तर भगवा रंग हा त्यागाचे, सन्मानाचे प्रतिक आहे, तिरंगा हा एक विचार आहे, स्वप्न आहे त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत असे सपकाळ म्हणाले.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY