खेड (प्रतिनिधी) : — तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत वाराणसीतील १९ वर्षीय युवकाचीआत्महत्या ! कंपनीत १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नितीनकुमार प्रमोद सिंग (रा. कमोरिया हाथी बाजार, तेदुई, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे या युवकाचे नाव असून हि घटना दि. १६ मे रोजी रात्री १० ते १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या मुदतीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची खबर देणार सुख्खु लालताप्रसाद सिंग यांचा मयत पुतण्या नितीनकुमार प्रमोद सिंग हा कोठेही मिळून न आल्याने त्याची शोधाशोध केली असता तो परशुराम लोटे येथील एका कंपनीच्या बॉयलर शेडमध्ये वरील छताच्या लोखंडी पाईपाला तो वापरत असलेल्या गमछाने गळफास लावून लटकलेला दिसला. या घटनेबाबत पोलीसांना कळवून पंचासमक्ष मयत नितीनकुमार प्रमोद सिंग यास खाली उतरवून कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांनी नितीनकुमार प्रमोद सिंग यास तपासून मयत घोषित केले.