चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी श्रीv शिवराज मंच मालवणतर्फे एक विशेष उपक्रम म्हणून ‘शिवराज भूषण’ हे भव्य महानाट्य शहरात सादर होणार अवतरणार आहे. त्याचदरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
यासंदर्भात सोमवारी सांस्कृतिक केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेला निर्माता भूषण साटम, साहित्यिक, नाट्यप्रेमी प्रकाश देशपांडे, संजय शिंदे, समीर शिंदे, दिनेश आंगणे उपस्थित होते. या महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांनी केले आहे .
