लांजा : (गोविंद चव्हाण) लांजा शहरातील कल्पना कॉलेज येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. समीर घोरपडे आणि नंदकुमार लिंगायत यांनी मोलाचे विचार मांडले. तसेच लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, गोशाळेच्या प्रमुख नंदा बिर्जे, कार्यक्रमाच्या प्रमुख तिलोत्तमा खानविलकर आणि अमृता तांडेल यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कल्पना कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा — सिद्धी जूवेकर, तन्वी पांचाळ आणि वृषभ पांचाळ — गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अनिता चव्हाण यांनी गीतगायन केले. सूत्रसंचालन तिलोत्तमा खानविलकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथील दीपाली देसाई, सुवासिनी सार्दळ, लांजा येथील चव्हाण सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्मिता दळवी यांनी आभार प्रदर्शन करून केली. यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
