मुंबई : मा. उपमुख्यमंत्री तथा युवा व क्रीडा मंत्री सुनेत्राताई (वहिनी) पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्यातील क्रीडामैदानांवर महिला खेळाडूंसाठी सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित राहिलो.

बैठकीत ग्रामीण व निमशहरी भागातील महिला खेळाडूंना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, फ्लडलाइट व्यवस्था तसेच सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याने महिला खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः असुरक्षित वातावरण आणि लैंगिक छळाच्या भीतीमुळे अनेक मुली सरावाचा वेळ कमी करतात, तर काही जणी क्रीडा क्षेत्रापासून दूर जातात. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकसमान “महिला क्रीडा सुरक्षा धोरण (Women Sports Safety Policy)” लागू करणे, तसेच प्रत्येक क्रीडांगणावर महिला खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा बंधनकारक करण्याची मागणी बैठकीत मांडली. हिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक व प्रोत्साहनपर क्रीडा वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे. या संदर्भातील निवेदन मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना सादर केले असून, या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन विविध मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनादेखील सादर केले आहे.

अतिशय सकारात्मक बैठक झाली. मला विश्वास आहे की, बैठकीत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक विचार होईल, ज्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट महिला खेळाडू घडतील.