खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील उधळे येथील हॉटेल दीपकसमोर मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक (टीएन-३७-ईवाय-८३७५) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने रिक्षा क्रमांक (एमएच-०८-बीसी-४१८९) ला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार रणजीतकुमार (वय २३) हा जखमी झाला. हा अपघात बुधवार, दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी १२:३४ वाजता घडला. अपघातातील जखमी दुचाकीस्वारास नरेंद्राचार्य नाणीजधामच्या २४ तास रुग्णवाहिकेचे चालक सुरेंद्र हंबीर यांनी तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन रुग्णवाहिकेतून कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.