मुंबई : आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत. शिवसेनेसाठी त्यांनी कधीही तुरुंगवास भोगला नाही. एकदा तुरुंगवास भोगला तोही पत्राचाळीत घोटाळा केल्याबद्दल. आता देशातल्या तरुणाईला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या संजय राऊत यांनी आधी स्वतः भांडुपच्या गाढव नाक्यावर आंदोलन करावे आणि एकट्याचा भव्य मोर्चा काढावा, असा टोला लगावत त्यांची पात्रता गाढव नाक्यावर आंदोलन करण्याचीच आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी फटकारले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नीट पेपरफुटीतील सर्व दोषींना अटक करण्याचे काम सीबीआयने केले. राज्य सरकारनेही कारवाई केली. मुळात नीट परीक्षेत कुठलीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र सरकार अतिशय सतर्क आहे. कोक्रोच जनता पार्टी असेल किंवा अन्य कुणीही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकते. संजय राऊतांनीही भांडुपच्या गाढव नाक्यावर जाऊन बसून आंदोलन केले पाहिजे. तुमच्या मागे गाढव नाक्यावरचे गाढवही उभे राहणार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
तरुणांना आंदोलनाचे आवाहन करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे – नवनाथ बन यांचा टोला
