चिपळूण (प्रतिनिधी) : खेंड चिपळूण येथे नुकतेच उद्घाटन झालेल्या विभा अरविंद ग्रंथालयाला सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक, अपरांत हॉस्पिटल, चिपळूणचे संचालक तथा “आपलं चिपळूणचे” उपाध्यक्ष श्री.प्रशांत पाटेकर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी ग्रंथालयाचे पालक श्री प्रकाश काका देशपांडे व डॉ. जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत करून ग्रंथालयाच्या स्थापनेमागील उद्देश, वाचन संस्कृतीच्या जतनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच ग्रंथालयाच्या कार्याची महती उपस्थितांना सांगितली.
या उपक्रमाचे कौतुक करत श्री. प्रशांत पाटेकर यांनी आपले वडिल कै. प्रभाकर नारायण पाटेकर यांच्या स्मरणार्थ ग्रंथालयाला पुस्तकांची कपाटे भेट दिली व भविष्यातही भरीव आर्थिक सहकार्यही प्रदान करण्याचे अभिवचन दिले . त्यांच्या या उदार योगदानामुळे ग्रंथालयाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
श्री. प्रशांत पाटेकर यांनी दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
विभा अरविंद ग्रंथालय या वाचन चळवळीच्या उपक्रमाला अल्पावधीतच वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.