रामपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ वा वर्धापन दिन हा १० जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणार होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालय मुंबई मधील विलास पटवर्धन यांनी प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले की, बुधवार १० जून ऐवजी ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य, सभापती, पंचायत समिती सभासद, नगराध्यक्ष, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख यांनी बदल केल्याची नोंद घ्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सर्वांनी नोंद घेऊन गुरुवारी दि. ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ वा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- हंगामापूर्वीच कोकणात सागरी कासवांच्या विणीला सुरुवात; गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले पहिले घरटे…
- रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात प्रगत ‘एएलएच एमके-३’ दाखल…
- आंदोलन अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणार’- राहुल गांधी…
- “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत जि.प. शाळा कुडुक खुर्द नं. 1 शाळेची आतखोल येथील ऋषिप्रभा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट…
- ‘वंदे मातरम्’मधील ‘सुजलाम्’ शब्दातून भारतीय जलसंस्कृतीचा उलगडा…