रामपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ वा वर्धापन दिन हा १० जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणार होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालय मुंबई मधील विलास पटवर्धन यांनी प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले की, बुधवार १० जून ऐवजी ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य, सभापती, पंचायत समिती सभासद, नगराध्यक्ष, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख यांनी बदल केल्याची नोंद घ्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सर्वांनी नोंद घेऊन गुरुवारी दि. ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ वा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- दापोली नाभिक समाजाचे श्री संतसेना महाराज मंदिर लोकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न..
- माजी. खासदार विनायक राऊत यांचा चिपळूण तालुक्यातील देवीदर्शन दौरा उत्साहात…
- नागावमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यावसायिकांसाठी विशेष मार्गदर्शन चर्चासत्र…
- चिपळूण नगर परिषदेची शेंगदाणा बिल्डिंग पाडण्यापूर्वी निधीची उपलब्धता स्पष्ट करा; आ. भास्करराव जाधव यांचे चिपळूण नगराध्यक्षांना पत्र…
- लांजा तालुका पांचाळ-सुतार समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अमोल शिरीषकुमार मेस्त्री यांची बिनविरोध निवड…