मुंबई : महाकारुणिक तथागत भगवान बुध्दांनी दिलेला शांतीचा विचार जगाचा तारणहार विचार आहे. बुध्दांचा शांतीचा विचारच जगाला युध्दापासुन दुर ठेवु शकते. बुध्द तत्वज्ञानच जगाल युध्दापासुन परावृत्त करु शकते. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी राजकोट येथे बोधिसत्व आंबेडकर बुध्दविहाराचे लोकार्पण प्रसंगी केले.

राजकोट येथील वीरत्न भंते यांची मनापासुन अशी इच्छा होती या बुध्द विहाराचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते व्हावे. त्यानुसार ना. रामदास आठवले यांनी आज वेळ देवुन राजकोट येथील या बुध्दविहाराचे लोकार्पण केले. या बुध्दविहारात अत्यंत सुंदर बुध्द स्तुपाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. यावेळी बुध्दगयातील महाबोधी महाविहार ट्रस्टचे सदस्य आणि आग्रा येथील भंते अनंद महाथेरो तसेच रिपब्लिकन पक्षाचे गुजरात राज्य अध्यक्ष अशोककुमार भट्टी, प्रभारी जतीन भुट्टा आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

युध्दामुळे हिंसा वाढते, युध्दामुळे मानवहानी होते, युध्दाचे अनेक दुष्परिणाम आहेत. या युध्दाच्या दुष्परिणामापासुन जगाला वाचवायचे असेल तर बुध्द तत्वज्ञान हा एकमेव उपाय आहे. बुध्दांनी दिलेला अहिंसा आणि शांतीचा विचार हाच मानवजातीचा विश्वाच्या कल्याणाचा विचार आहे. बुध्द तत्वज्ञानातुन शांती आणि अहिंसेचा विचार अखिल मानवजातीने स्विकारला पाहिजे. बुध्द तत्वज्ञानामुळेच युध्दाच्या विचारापासुन जगाला परावृत्त करता येते, जगाला युध्दाच्या भयानक परिणामापासुन वाचवण्याची शक्ती केवळ बुध्द विचारामध्ये आहे. भगवान बुध्दांनी दिलेला शांती आणि अहिंसेचे विचार बुध्द तत्वज्ञानात आहे असे गौरवोउद्गार ना. रामदास आठवले यांनी यावेळी काढले.