पुणे : पुणे विद्यापीठात आज नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व NEET ची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे देण्यात यावी या मागण्यांसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका केली.
तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या विद्यार्थी नेत्यांनी मोदी सरकार व शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणाचा बाजार मांडल्याची सडकून टीका केली. तसेच भाजपच्या निवेदिता एकबोटेंच्या पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयातच नीट पेपर फुटी व प्रेम बिर्हाडे सारखे गंभीर प्रकरण कसे काय घडते? असा गंभीर प्रश्न करत निवेदिता एकबोटे, शिक्षिका मनीषा मांढरे व माॅडर्न महाविद्यालयाच्या भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रशासनावर गंभीर टिका केली.
