चिपळूण – येथील स्नेहा शीला ओतारी ही LLB परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने सिध्दयोग लाॅ काॅलेज खेड येथून शिक्षण पूर्ण केले. तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. असंख्य अडचणींवर मात करून तिने हे यश साध्य केले.
तिने याआधी 2008 मध्ये बीएस्सी ही डीबीजे काॅलेजमधून केले. एन सी सी च्या आर. डी कॅम्प मध्ये तिने नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्ये भारतातून आलेल्या सर्व मुलींची कॅम्प सिनियर म्हणूनही तिने जबाबदारी कुशलतेने सांभाळली होती. त्या कॅम्पमध्ये तिने स्वतः सामुहिक गायन, नृत्य, वादविवाद स्पर्धा आणि तिने महाराष्ट्रातून आलेल्या इतर मुलांना सोबत घेऊन सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या सादरीकरणाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. तिला त्या कॅम्पमध्ये बेस्ट कॅम्प सिनियर पारितोषिक देऊन कर्नल राव यांनी तिचे कौतुक केले होते. नंतर तिने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून MCA चे शिक्षण घेतले. त्यानंतर काही वर्ष Huawei या MNC कंपनीमध्ये ती Project Coordinator आणि knowledge Manager म्हणून काम केले. एन्झायटी, डिप्रेशन या सर्वांवर मात करत, अॅडमिशन घेतल्यापासून घरात विद्युत प्रवाह नसताना दुसऱ्यांच्या घरातून बॅटरी चार्जिंग करून त्यावर अभ्यास करून तिने हे उज्ज्वल आणि दैदीप्यमान यश संपादित केले आहे.
केवळ कायद्याचाच अभ्यास नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने तिने चिपळूण बचाव समिती, कालभैरव सांस्कृतिक मंच आणि चिपळूणमधील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक ग्रुप्स आणि त्यांनी केलेल्या कार्यक्रमात ती अत्यंत हौशेने प्रत्यक्ष कृतिशील सहभाग घेते आणि आजही या सामाजिक उपक्रमात ती कार्यशील असते. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन द्वारे तिचे अभिनंदन केले.
चिपळूणची स्नेहा ओतारी एलएलबीपरीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…!
