चिपळूण : पाग विभागातील पॉवर हाऊस परिसरामध्ये निर्माण झालेल्या समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पाग पॉवर हाऊस परिसरातील गतिरोधक अधिक सक्षम करणे, तसेच नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आणि पागेवरून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी मागण्यांचा समावेश होता.
या समस्यांबाबत महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्री. खुणेकर तसेच ईगल इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक श्री. मिथिलेश उर्फ (विकी) म. नरळकर, नगरसेवक श्री. फैसल कास्कर, नगरसेविका सौ. कांचन शिंदे, विभागप्रमुख श्री. मंगेश शेलार, उपविभागप्रमुख श्री. महेंद्र कांबळी, श्री. बापू चव्हाण आणि श्री. सुयश नरळकर उपस्थित होते.
