चिपळूण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी सावर्डे गावात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. सावर्डे बाजारपेठ, विविध वाड्या-वस्त्या तसेच सावर्डे-डेरवण फाटा परिसरात ठिकठिकाणी ‘प्लास्टिक बॉटल संकलन हाऊस’ बसविण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ करताना माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी ग्रामस्थ, व्यापारी व नागरिकांना प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा रस्त्यावर न टाकता संकलन हाऊसमध्ये टाकण्याचे आवाहन केले.
“प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास गाव स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल. नागरिकांनी सहकार्य करून परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे सौ. निकम यांनी सांगितले.
या वेळी सावर्डे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. पत्याने, माजी सरपंच श्री. बाळूशेठ मोहिरे, श्री. देवराज गरगटे, उद्योजक श्री. अभिषेक सुर्वे, सौ. सई सुर्वे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया सावर्डे शाखेचे व्यवस्थापक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ सावर्डे – सुंदर सावर्डे या संकल्पनेला या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे.
सावर्डे-डेरवण फाट्यावर ‘प्लास्टिक बॉटल संकलन हाऊस’चा उपक्रम ; स्वच्छतेसाठी नागरिकांनी प्लास्टिक कचरा संकलन केंद्रातच टाकावा – सौ. पूजा निकम यांचे आवाहन
