चिपळूण : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी चिपळूण शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. विविध मंडळांनी उभारलेल्या आकर्षक आरास, सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक उपक्रम आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत त्यांनी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.

या दौऱ्यात चिपळूण नगरपरिषद कर्मचारी वृंद सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अमृत महोत्सवी गणेशोत्सव, सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, नवसाचा चिपळूणचा राजा गणेशोत्सव मंडळ, राहुल गार्डन गणेशोत्सव मित्र मंडळाचा राहुल गार्डनचा राजा, चिपळूण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा महापुरुष गणपती आणि महावितरण गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भेट

चिपळूण नगरपरिषदेच्या कर्मचारी वृंदाच्या सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भेट दिली असता मुख्याधिकारी श्री.संजय जाधव,
उपमुख्याधिकारी तथा गणेशोत्सव अध्यक्ष श्री. प्रमोद ठसाळे, श्री. मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, सौ. खैरमोडे मॅडम यांच्यासह कर्मचारी वर्गाने स्वागत केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

अमृत महोत्सवी गणेशोत्सवात भक्तीचा उत्साह

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी गणेशोत्सवास भेट देताना माजी नगरसेवक तथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. मोहनशेठ मिरगल, श्री. सुनील कुलकर्णी, श्री. बाळा वेस्वीकर, श्री. रमण डांगे आदी मान्यवरांनी स्वागत केले.

गणेशोत्सवाच्या अमृत महोत्सवी पर्वानिमित्त मंडळाने जपलेल्या परंपरेचा आणि सामाजिक सहभागाचा यावेळी अनुभव घेण्यात आला.

‘चिपळूणचा महाराजा’च्या चरणी भक्तिभाव

सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे सदस्य श्री. बंधू कदम, सेक्रेटरी श्री. आकाश कदम आणि श्री. राहुल गुरव आदींनी स्वागत केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाने जपलेल्या परंपरा आणि भक्तिमय वातावरणाचा यावेळी अनुभव घेतला.

‘नवसाचा चिपळूणचा राजा’समोर नतमस्तक

त्यानंतर नवसाचा चिपळूणचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश टाकळे, सदस्य श्री. समीर टाकळे, श्री. रत्नदीप (दीपा) देवळेकर, श्री. प्रशांत मुळये आणि नगरसेवक शशिकांत मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या आयोजनाची यावेळी माहिती घेण्यात आली.

राहुल गार्डनच्या राजाचे दर्शन

राहुल गार्डन गणेशोत्सव मित्र मंडळाच्या ‘राहुल गार्डनच्या राजा’ गणपतीचेही दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष श्री. आदित्य चौगुले तसेच सदस्य श्री. साजन कापडी आणि श्री. मिनेश कापडी यांनी स्वागत केले.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘महापुरुष गणपती’ला भेट

चिपळूण पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या महापुरुष गणपतीचे दर्शन घेताना पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रकाश बेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. निकम तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कर्तव्य बजावताना सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग जपणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी यावेळी संवाद साधण्यात आला.

महावितरणच्या गणेशोत्सवातही सहभाग

महावितरण गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उपाध्यक्ष तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. डोंगरे, श्री. पाटणकर आणि श्री. राऊत आदींनी स्वागत केले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ संदर्भात सविस्तर माहिती दिली.

प्रा. रुपाली दांडेकर यांचा विशेष सन्मान

या गणेशोत्सव दौऱ्यात प्राध्यापक म्हणून ज्ञानदान आणि उपनगराध्यक्ष म्हणून लोकसेवा या दोन्ही जबाबदाऱ्यांचा सुंदर संगम साधणाऱ्या प्रा. सौ. रुपाली दांडेकर मॅडम यांनी ‘एज्युकेशन’ विषयात विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी संपादन केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रासाठीचे त्यांचे समर्पण आणि सार्वजनिक जीवनातील योगदान यांना साजेशा या शैक्षणिक यशाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

आदर्श हॉटेलमध्ये जुन्या आठवणींना उजाळा

गणेशोत्सव दौऱ्यादरम्यान माजी उपनगराध्यक्ष श्री. प्रकाश (बापू) काणे यांच्या आदर्श हॉटेलला भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत चहा-नाश्ता केला. यावेळी बापू काणे यांच्यासोबत संवाद साधताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक भेटीत जुन्या स्नेहबंधांना उजाळा देतानाच विविध विषयांवरही आपुलकीने चर्चा झाली.

उकडीच्या मोदक केंद्रालाही आपुलकीची भेट

गणेशोत्सवातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि महिला स्वावलंबनाचा सुंदर संगम असलेल्या गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट, पागझरी यांच्या उकडीचे मोदक केंद्रालाही भेट देण्यात आली. महिला भगिनींशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या उपक्रमाची विचारपूस करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा प्रमुख श्री. सचिन कदम उपस्थित होते.

पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग

या संपूर्ण गणेशोत्सव दौऱ्यात उपशहर प्रमुख, गटनेता तथा नगरसेवक श्री. मिथिलेश (विकी) नरळकर, विभाग प्रमुख तथा नगरसेवक श्री. संजय गोताड, नगरसेवक श्री. फैसल कास्कर, नगरसेविका सौ. वैशाली कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री. सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, युवती सेना तालुका अधिकारी सौ. तीर्था लाड, विभाग प्रमुख श्री. नितीन निकम, श्री. दीपक ओकटे, उपविभाग प्रमुख श्री. फैय्याज शिरळकर, चिपळूण रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष श्री. बाळा आंबुर्ले, श्री. संदीप साडविलकर, श्री. राजू गायकवाड, श्री. श्लोक साडविलकर, श्री. विलास कदम, कु. दामिनी दळी, श्री. विशाल खेडेकर आदी पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गणरायाच्या दर्शनासोबतच शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांशी साधलेला संवाद, पर्यावरणपूरक उपक्रमांना दिलेली भेट, महिला बचत गटाच्या उपक्रमाची घेतलेली दखल आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा झालेला सन्मान यामुळे आमदार भास्करराव जाधव यांचा गणेशोत्सव दौरा भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा मंगलमय संगम ठरला.