खेड : गणेशोत्सवासाठी खेड, दापोली व मंडणगड परिसरात आलेल्या लाखो गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सोयीचा व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा आदरणीय योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता मोफत गणपती विशेष मेमू रेल्वे सोडण्यात आली.
कोकणातील गणेशोत्सव हा श्रद्धा,परंपरा आणि भावनेचा उत्सव आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये,गर्दीचा त्रास कमी व्हावा आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा,या उद्देशाने ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या विशेष मेमू रेल्वेच्या माध्यमातून गणेश भक्तांना त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली. या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
या विशेष रेल्वे सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे सर्व गणेश भक्त, नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
खेड रेल्वे स्थानकावर शिवसेना परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती
या विशेष मेमू रेल्वेच्या निमित्ताने खेड रेल्वे स्थानकावर शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, रिक्षा सेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख सचिन धाडवे,शहरप्रमुख कुंदन सातपुते,उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे,नगरसेवक प्रेमल चिखले,माजी नगरसेवक अंकुश विचारे, संदीप धाडवे, राजेेन्द चाळके,युवासेना तालुकाप्रमुख श्री.मिलिंद काते, पसाद पाटणे,राहुल शिंदे,शुकलेंद्र काते,पराग बांदिवडेकर,श्री.मानस उपावले,नील गुहागरकर रिक्षा सेना अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी,युवासेना,रिक्षा सेना आणि असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भक्तांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून जनसेवा आणि गणेश भक्तांप्रती असलेली आपुलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.