नवी दिल्ली : सत्ता असो वा नसो आपण आपल्या विचारांशी असलेली निष्ठा जपली पाहिजे. कधी सत्तेत असू तर कधी विरोधात पण आपण संघर्ष सोडायचा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,उद्धवजी भेटत नाहीत, या गोष्टीत तथ्य नाही. उद्धवजींचा पक्ष पुन्हा फोडण्यात आला, याचा मी जाहीर निषेध करते,असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,अगोदर ICE इन्कम टॅक्स,सीबीआय आणि इडी चा वापर करून पक्ष फोडण्यात आले होते. आत्ताचे नवीन मॉडेल माहीत नाही, पण जे झाले ते दुर्दैवी आहे,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आशाताई आणि मराठी भाषेचा जो अपमान केला, तो खूप दुर्दैवी आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. मराठी येत नसेल, तर त्यांनी त्याचा क्लास लावावा, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.