लांजा (गोविंद चव्हाण) : लांजा उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी पोलीस सभागृह ‘संकल्प सिद्धी हॉल’ येथे MDDC/TOT प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील PSI बोकेफोडे, DIHC सारदळ आणि DILHC पाटील यांनी दंगा नियंत्रणाबाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक (डेमो) सादर केले.
या प्रशिक्षणास लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुख्तार शेख यांच्या उपस्थितीत खालीलप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
- लांजा पोलीस स्टेशन – PI : 1, WAPI : 1, PSI : 1, अंमलदार : 6
- राजापूर पोलीस स्टेशन – PI : 1, PSI : 1, अंमलदार : 7
- नाटे पोलीस स्टेशन – API : 1, अंमलदार : 3
- देवरुख पोलीस स्टेशन – PSI : 1, अंमलदार : 7
- होमगार्ड – 24
प्रशिक्षणादरम्यान लाठी सेक्शन, ढाल सेक्शन तसेच हँड ग्रेनेड सेल वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.