मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेसोबतच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेसमोर भारताची स्वायत्तता कमी होत असल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जसे विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची जी-हुजरेगिरी केली होती, तसेच आज नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर हुजरेगिरी करत आहेत आणि अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहेत. त्यांनी टोला लगावत असेही म्हटले की, “मोदी टॉयलेटलाही कदाचित अमेरिकेला विचारूनच जात असतील.”
भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. मोदी सरकारने हा ‘मुजरा’ थांबवला नाही, तर भारत पुन्हा एकदा गुलाम देश बनण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. परराष्ट्र धोरण आणि भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
