रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : जागतिक महिला दिना निमित्ताने महिला व तरुणी स्वलंबी होणाच्या दृष्टीने रोहा अष्टमी नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत नगराध्यक्षा कु.वनश्री समीर शेडगे यांच्या संकल्पेतून कपडावर आरिवर्क बनविणे, ज्यूटच्या वस्तू बनविणे, साबण, वाशिंग पावडर, हॅन्डवाश बनविणे इत्यादी ९ दिवस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा शहरातील ४०० महिलांनी लाभ घेतला असून या शिबिराच्या माध्यमातून शेकडो महिला व तरुणांना कला अवगत करण्याची संधी मिळाल्याने महिला व तरुनींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.६ मार्च रोजी नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे दिप प्रज्वलन व कर्तृत्वान महिलांना स्मरण करुन त्यांच्या तसबीरला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. तर दि.१४ मार्च रोजी या शिबिराचे समारोप करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील माऊली फाउंडेशन प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख श्रीमती अर्चना माने यांनी सदर प्रशिक्षणाचे योग्य नियोजन केले होते.तर कार्यक्रमांच्या समारोपाच्या निमित्ताने महिलांकरिता डिजिटल मार्केटिंग बेसिक प्रशिक्षणाचे आयोजन करुन उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या महिलांच्या ज्ञानात भर घातली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. येणाऱ्या काळात महिलांकरिता संस्कृतिक कार्यक्रम व महिला उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे आयोजन करण्याच्या सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या. तर दिलेल्या सूचनांची अंमलाबजावणी करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा कु. वनश्री शेडगे यांनी दिले. या वेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. निता हजारे यांनी उपस्थित महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष समीर शेडगे,उप सभापती सौ.गौरी बारटक्के, सभापती महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, राजेंद्र जैन, गट नेते महेंद्र गुजर, नगरसेवक अजीत मोरे, प्रशांत कडू, अरबाज मणेर,रोशन चाफेकर,दिवेश जैन,नगरसेविका सौ. स्नेह अंब्रे, डॉ. सौ. प्रियंका धनावडे, सौ. फरहा पानसरे,अफरीन रोगे, अलमास मुमेरे, संजना शिंदे, पूर्वा मोहिते, सुप्रिया जाधव आदी जण उपस्थित होते..