चिपळूण : कोकण… नुसतं नाव जरी कानावर पडलं, तरी मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध…

डोळ्यांसमोर उभे राहतात अथांग समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा, लाल मातीचे रस्ते आणि माणुसकीचा गोड स्पर्श… कोकण म्हणजे निसर्गाने लिहिलेली एक सुंदर कविता… अशाच या स्वर्गीय कोकणाच्या साक्षीने खुलणार आहे अनोखी प्रेमकहाणी ‘विसरू नको तू मला’. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाहवर ही मालिका येत्या सोमवारपासून, म्हणजेच २९ जूनपासून, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निसर्गरम्य गुहागरच्या साक्षीने फुलली आहे एक सुंदर प्रेमकहाणी… निसर्गसौंदर्याने नटलेल्या गुहागरमध्ये या मालिकेचं चित्रीकरण पार पडलं आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रमोशनचा श्रीगणेशा देखील कोकणातूनच झाला.

‘विसरू नको तू मला’ या मालिकेतील महाराष्ट्राची सुपरहिट जोडी सूर्या आणि वैदू, म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी चिपळूण मधील डी.बी.जे. महाविद्यालयासोबतच गुहागरमधील सुप्रसिद्ध व्याडेश्वर मंदिर, अंजनवेल आणि वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्याची सफर केली.

कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि कोकणकरांचं प्रेम पाहून कलाकार भारावून गेले. “हेच प्रेम आम्हाला काम करण्यासाठी नवी ऊर्जा देतं,” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली. तेव्हा नक्की पाहा नवी मालिका ‘विसरू नको तू मला’, सायंकाळी ७ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.