चिपळूण: शहरात रविवार दि.८ मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वजण या सणात सहभागी झाले होते.

चिपळूणच्या वेगळ्या प्रभागांमध्ये सकाळपासूनच बच्चे कंपनी रंगात न्हाऊन निघाली होती. दुपारनंतर रंगपंचमीचा सण साजरा करताना सर्वच वयोगटातील नागरिक दिसून आले. सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या नदीकिनारी नागरिक आंघोळीला गेले आणि सण शांततेत साजरा झाला. मार्कंडी येथे पाण्याशिवाय रंगपंचमी साजरी करण्यात आली. पाण्याची उधळपट्टी नको म्हणून नैसर्गिक रंग एकमेकांना लावून सर्वांनी आनंद लुटला. गोवळकोट भोईवाडी येथे तरुणांनी रंगपंचमीचा जल्लोष साजरा केला. मार्कंडी येथे बच्चे कंपनी आनंद लुटलांना दिसली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
