लांजा: लांजा पंचायत समितीच्या सभापतीपदी अखेर मानसी आंबेकर तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांची निवड करण्यात आली असून सोमवार दि. ९ मार्च रोजी दोघानीही आपल्या पदाचा पदभार पिठासन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थित स्वीकारला.
लांजा शहरातील कुळकर्णी-काळे छात्रालाय व पंचायत समिती सभापती दालन येथे सोमवारी दुपारी ३ वाजता पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी पिठासन अधिकारी वंदना खरमाळे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, गटविकास अधिकारी हींदुराव गिरी, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, शिवसेना लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, जि. प सदस्या मनिषा लाखन, पं स सदस्य अरुण उर्फ दादा पत्की, पं. स सदस्या साक्षी चव्हाण, जगदीश राजापकर, यांसह नवनिर्वाचित पं स व जि प सदस्य उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या लांजा तालुक्यातील आठ पंचायत समिती गण आणि चार जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने सर्व जागांवर दणदणीत विजय प्राप्त करून पंचायत समितीवर सत्ता काबीज केली आहे. एकतर्फी सत्ता असलेल्या लांजा पंचायत समिती सभापतीपदी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याच्या नजरा लागल्या होत्या. यामध्ये सुरवातीपासूनच सभापतीपदी मानसी आंबेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर चर्चा खरी ठरली असून लांजा पंचायत समिती सभापतीपदी मानसी आंबेकर यांची निवड झाली. तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तबच झाला. त्यामुळे नावे जाहीर होताच सोमवारी सभापती व उपसभापती पदाचा पदग्रहण पार पडला. यावेळी शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपतालुका संघटक, विभागप्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख व संघटक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी सर्व पदाधिकारी, युवती सेना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पिठासन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या हस्ते सभापतीपदी मानसी आंबेकर व उपसभापतीपदी आदेश आंबेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH