खेड : इच्छापूर्ती गणपती मंदीर, गणेश मित्र मंडळ खेंड चौकी यांच्या वतीने दादा खातू लिखित ‘स्वामी नामाचा अगाध महिमा’ आणि ‘शिंपल्यातील मोती’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवार दि. 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
गुरुदेव दास दिगंबर महाराजांच्या हस्ते प्रकाशन: श्री स्वामी समर्थ मठ, गावखडीचे मठाधिपती श्री गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या पवित्र हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. स्वामी श्रद्धाभक्तीप्रती दादा खातू यांना आलेल्या अनुभूती या पुस्तकांत शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत.
मान्यवरांची मांदियाळी: या सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी मा. आमदार श्री. रमेशभाई कदम, मा. आमदार श्री. भास्करशेठ जाधव, मा. आमदार श्री. शेखर सर निकम, मा. आमदार श्री. सदानंदभाई चव्हाण, नगराध्यक्ष श्री. उमेशजी सकपाळ आणि उद्योगपती श्री. प्रशांतसाहेब यादव उपस्थित राहणार आहेत.
आयोजन समिती: पुस्तक प्रकाशन कमिटीचे अध्यक्ष श्री. मिलींदशेठ कापडी, उपाध्यक्ष श्री. संदीपशेठ मनोरेकर तर इच्छापूर्ती महिला गणेश मंडळाच्या अध्यक्षा सौ. क्रांती म्हापूसकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.