रसायनी : रसायनी येथे पाताळगंगा नदीवरील बंदाऱ्यावर एक तरुण पोहायला गेला असता तो बुडाल्याची घटना गुरुवारी सांयकाळी घडली होती.

संचित नावाचा एक परप्रांतीय कामगार तरुण पाताळगंगा नदीवर असणाऱ्या रसेश्वर नदिपात्राच्या बंधाऱ्यावर पोहायला गेला होता. पोहत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

वेळ सायंकाळची होती. अंधार झाल्याने स्थानिक व रसायनी पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अडचणी आल्या. रसायनी पोलिसांनी याबाबत हेल्प फाउंडेशनची मदत मागितली. आज सकाळी हेल्प फाउंडेशन च्या टीम ने पाताळगंगा नदीत सर्च ऑपरेशन करून त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. मृत 29 वर्षीय तरुण संचित हा मुळचा सरस्वती, उत्तरप्रदेश येथील असल्याचे समजते.अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ‌