चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या विद्यमाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 26, 27 व 28 जून रोजी तीन दिवसीय जिल्हास्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण अर्बन बँकेच्या कै. राजाभाऊ रेडीज सभागृहात ही स्पर्धा पार पडत आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ सकाळी 11.00 वाजता पार पडला. श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर, प्रयोजक अष्टविनायक डेव्हलपर्सचे पार्टनर व नगरसेवक श्री. उदय जुवळे तसेच श्री. उमेशशेठ काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल, कार्याध्यक्ष श्री. रमण डांगे, श्री. राजाभाऊ पाटणकर, श्री. जितेंद्र वेस्वीकार, सेक्रेटरी श्री. प्रभंजन पिंपुटकर, खजिनदार श्री. शेखर सावले, श्री. नित्यानंद भागवत, श्री. शिवप्रकाश घाटगे, श्री. विलास बांद्रे, श्री. सुरेश आवटे, श्री. सुनील कुलकर्णी, श्री. समीर जानवलकर, श्री. चिन्मय फडके, श्री. मुन्ना वरवडेकर तसेच चिपळूण अर्बन बँकेचे संचालक श्री. निहार गुढेकर, श्री. भाऊ दळी, श्री. सतीश अप्पा खेडेकर, श्री. रहीमान दलवाई, श्री. मिलिंदशेठ कापडी, श्री. सुनील खेडेकर, श्री. रत्नदीप देवळेकर, श्री. समीर टाकळे, सीए श्री. विवेक रेळेकर, श्री. मधुसूदन माने आदी उपस्थित होते.

या शुभप्रसंगी मान्यवरांबरोबरच राष्ट्रीय विजेते कॅरमपटू रियाज अकबर अली यांचा मंडळाच्या वतीने तसेच चिपळूण अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.