रायगड (मनोज खांबे ) : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले हे रायगडचे पालकमंत्री कधी होणार, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही सर्वजण शिवछत्रपतींचे मावळे आहोत. आमच्या पाठीशी छत्रपतींचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादामुळे भरतशेठ गोगावले हे देखील लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत नव्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.