मुंबई : मा. उद्धवजी, तुम्ही म्हणालात, “40 वर्षांपूर्वी यवतमाळात भाजपाचे कार्यालय तरी होते का?” पण पुन्हा-पुन्हा तीच चूक तुम्ही करत आहात. अशाने उरला-सुरला उबाठा गट अजिबात वाढणार नाही.

1983 मध्ये, म्हणजे 43 वर्षांपूर्वी, यवतमाळकरांनी पक्षकार्यासाठी 1.51 लाख रुपये जमा करून दिले होते. हे यवतमाळकरांचे भाजपाच्या विचारांवरील प्रेम होते. त्यावेळी आमचे नेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे वडील, स्व. गंगाधरराव फडणवीस, हेही उपस्थित होते.

त्यामुळे पुढील काही दिवसांत दौरे जरूर करा; पण उगाच वाफ दवडू नका.