चिपळूण : जन्माची नोंद ग्रामपंचायत मध्ये दाखल करताना कुठल्या जातीला मुळे जन्माला आलं आहेत, याची नोंद करण्याचा ऑनलाइन अथवा ऑफलाइन कॉलम नसल्यामुळे जन्म नोंद करतेवेळी जातीचा उल्लेख होत नाही, यामुळे जातीचा दाखला व जात पडताळणी करतेवेळी पालकांना फार अडचण निर्माण होत आहे व त्यांना वण_वण फिरावं लागत आहे.
शाळेच्या दाखल्यावर मुलांना शाळेमध्ये पहिल्यांदा प्रवेश करते वेळी जातीच्या दाखल्याचा उल्लेखाची तरतूद आहे. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असतो परंतु जातीची नोंद घालताना ऑनलाइन तरतूद किंवा ऑफलाईन तरतूद नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तरी ग्रामपंचायती नगरपरिषद येथे जन्माची नोंद घालतेवेळी जातीच्या उल्लेखाचा कॉलम असावा अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी शासनाकडे केली आहे.
व ते पुढे म्हणाले की जन्म नोंद घालताना सर्व जातीचा उल्लेख ऑनलाईन किंवा ऑफलाईन झाला पाहिजे, म्हणजे पालकांना जातीचा दाखला काढतेवेळी त्रास होणार नाही. शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद जरी असली तरी वरील दाखले काढताना ते ग्राह्य धरले जात नाही. तेथे जन्म नोंद व जातीचे उल्लेख असला पाहिजे,अशी शासकीय कार्यालयात मागणी केली जाते. व ती नसल्यामुळे जातीचा दाखला व जात पडताळणी करण्यासाठी पालकांच्या समोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तरी शासन दरबारी याचा ताबडतोब विचार करून पालकांवर आलेले संकट दूर करून ग्रामपंचायत व नगरपरिषद मध्ये जन्माचे नोंद घालताना जातीचा उल्लेख करण्याचा कायदा करावा अशी ही मागणी श्री मुकादम यांनी केली आहे.
ग्रामपंचायती मध्ये जन्म नोंद करतेवेळी जातीच्या उल्लेखचा कॉलम नसल्यामुळे जातीचा दाखला व जात पडताळणी करण्यासाठी पालकांना अडचणी, तरी जन्मनोंद करतेवेळी जातीच्या उल्लेखाचा कॉलम असला पाहिजे…
